सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला भाजप नेताच आरोप

राज्यात नुकत्याच काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तेव्हाही प्रचंड राजकारण तापले होते. आता बदल्यानंतरही एक नवा वाद समोर आला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि यामधून प्रचंड पैसा गोळा केला असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी केला आहे. यासोबतच याची सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिलेला होता. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बदल्यांवरील स्थगिती उठवण्यात आली हे आश्चर्यकारक आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने बदल्या रोखल्या होत्या मात्र नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठवण्यात आली. या बदल्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यासोबतच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यामध्ये अन्याय झाला आहे. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे.

हे वाचा – CET होणार की नाही? काय म्हणाले उच्च शिक्षणमंत्री?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!