नागपूर : केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विषयक विधेयकांच्या संदर्भात ते नागपूरमध्ये बोलत होते. ही विधेयके ऐतिहासिक असून यामुळं शेतकरी आपला माल देशभरात कुठेही विकू शकतो, असं फडणवीस म्हणाले. कृषी विधेयकाला शिवसेनेनं राज्यसभेत विरोध केला. ‘ही विधेयके इतकी क्रांतिकारक आहेत तर यापुढं कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी सरकार देणार का, असा सवाल शिवसेनेचे खासदार
संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.
‘शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. त्यांना अनेक मुद्द्यांवर भूमिकाच घेता येत नाही आणि आता तर त्यांना त्यांची सवयही झाली आहे. यात आम्हालाही आता नवल वाटत नाही,’ अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.