मुंबई: बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे वाचा : पाकिस्तान: पेशावरमध्ये मदरशात भीषण स्फोट; सात ठार, ७० जखमी

योगेश असे हल्लेखोराचे नाव असून, त्याने स्वतःची निर्माता म्हणून ओळख करून दिली होती. वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, तिची प्रकृती आता स्थिर आहे.