मुंबईः मराठा समाजाला आरक्षण देताना त्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं कलम त्यात टाकलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही.
हे वाचा : सोन्याचा दारात ७ हजाराहून अधिकची घसरण, जाणून घ्या दर
या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय, ओबीसी आरक्षणात कोणताही वाटेकरी स्वीकारणार नसून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
हे वाचा : बिअर पिणाऱ्यांची फसवणूक तर होत नाहीय ना…?
मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं याबाबत काही शंकाच नाही पण ओबीसीच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भाजपच्या ओबीसी कार्यकारणीची बैठकीत ते बोलत होते.