देशातील भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर ऍटिजेन टेस्टसाठी बीड जिल्हा सज्ज

देशातील भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर बीड येथेही सलग तिन दिवस उद्यापासून व्यापार्‍यांच्या ऍटिजेन टेस्टला सुरूवात करण्यात येणार असून व्यापार्‍यांसाठी बीड शहरातील बलभीम महाविद्यालय, नगर रोडवरील चंपावती शाळा, मोढ्यांतील वैष्णवी पॅलेस आदि ठिकाणी या टेस्ट करण्यात येणार असून व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात या टेस्टसाठी आपला सहभाग नोंदवावा. यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी आणि प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत ऍटिजेन टेस्टसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे व्यापार्‍यांनी आश्‍वासन दिले.

किराणा दुकानदार, स्टेशनरी दुकानदार, खत बि-बियाणांचे दुकानदार, कृषी साहित्य विक्रेता, कपडा व्यापारी, भांडीचे दुकानदार याठिकाणी सामान्य लोकं खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात जा ये असते. किराणा दुकानदारांकडे तर मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांची खरेदीसाठी झुंबड असते. या खरेदीसाठी सर्वस्तरातील लोक येत असतात. आणि त्यापासून अनेकांना कोरोना रोगाची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामूळे यासर्व दुकानदार आणि व्यापार्‍यांची तपासणी केल्यानंतर एकूण किती दुकानदार बाधीत आहे

बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात प्रयोग करण्यात आला.

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बीड शहरातही दुकानदार आणि व्यापार्‍यांच्या ऍटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने उद्या पासून दि.०८,०९ आणि १० या तिन दिवसाच्या कालावधीमध्ये शहरातील सर्व दुकानदार व व्यापारी यांच्या तपासण्या वैद्यकीय पथकामार्फत करण्यात येणार आहे. या तपासण्या करण्यासाठी पाच कर्मचार्‍यांचे एक वैद्यकीय पथक असे सहा पथके नियुक्त केले असून या पाच पथकांवर देखरेख ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. सर्व दुकानदार आणि व्यापार्‍यांनी सहकार्य करावे. व्यापार्‍यांच्या अडचणी त्यांच्या शंका त्यांचे प्रश्‍न काय हे समजण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी व्यापारी प्रतिनिधींची बैठक घेतली.बीड शहरातील बलभीम कॉलेज, चंपावती शाळा, वैष्णवी पॅलेस एमआयडीसी, बार्शीनाक्यावरील जि.प.शाळा, मोेंढा भागातील राजस्थानी शाळा, या सहा ठिकाणी या तपासण्या होणार आहे. 
आजही पाठवले ६८७ स्वॅब 

अँटीजेन टेस्ट मोफत, कोणालाही पैसे देऊ नका -जिल्हाधिकारी

अँटीजेन टेस्ट मोफत असून त्यासाठी पैसे कोणालाही देऊ नये असे आव्हान बीडचे जिल्हाधि8 राहुल रेखावर यांनी केले आहे.बीड शहरातील व्यापार्‍यांसह फळभाजी विक्रेते, दूध विक्रेते यांची उद्यापासून जी अँटीजेन टेस्ट होणार आहे ती पूर्णपणे विनामूल्य.

शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरभरातील व्यापारी, फळभाजी विक्रेते, दूध विक्रेते यांच्यासह छोटेमोठे व्यवसायिक जे की सातत्याने अन्य लोकांच्या संपर्कात येतात अशा सर्वांची अँटीजेन टेस्ट उद्यापासून करण्यात येणार आहे. सदरची टेस्ट ही पूर्णपणे विनामूल्य असल्याने त्यासाठी कोणालाही कोणी पैसे देऊ नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे. 

सबंधित बातम्या

बीड कोरोना 124 पॉझिटिव्ह

कोरोनाचा वेग डबल:21 दिवसात रुग्णांचा आकडा 10 वरुन 20 लाखांवर पोहचला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!