बीड :कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सहा शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन केलेले आहे. बीड परळी वैजनाथ ,अंबाजोगाई ,आष्टी, केज या शहरातील सर्व बँकांना लॉक डाऊन कालावधीमध्ये बँकेचे दैनंदिन कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत असून यासाठी सर्व बँका अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या ओळखपत्राचा वापर करावा. त्याच प्रमाणे पोस्ट ऑफिस विभागातील अधिकारी कर्मचारी यांना देखील त्यांचे शासकीय ओळखपत्र द्वारे पोस्टाचे दैनंदिन कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
सर्व घाऊक व्यापारी होलसेलर्स यांना त्यांचा आलेला माल उतरवून घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे
बँकांसंदर्भातील जिल्हा प्रशासनाचे आदेश

हे वाचा: बीड: दैनंदिन कामकाज करण्यास यांना लॉक डाऊन मधून सूट
गणेशमुर्ती विक्रेत्यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक जिल्हा प्रशासनाचे आदेश
