बीड नगरपरिषद: नगराध्यक्षपद ‘महिला प्रवर्ग’ आरक्षित
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बीड (Beed) नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीनुसार, बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी महिना संपण्यापूर्वी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या अनुषंगाने, प्रशासन वेगाने निवडणुकीची तयारी करत आहे. ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयातील परिषद सभागृहात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
या आरक्षणामुळे बीडमध्ये आता कोणत्या पक्षाला किंवा गटाला अधिक फायदा होईल, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नगराध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आता महिला उमेदवार व त्यांच्या पाठीराख्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आरक्षण जाहीर झालेल्या एकूण 33 नगरपरिषदांपैकी, बीड हे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण जाहीर झालेल्या 16 नगरपरिषदांपैकी एक आहे.