बीड दिनांक 25 (प्रतिनिधी:
बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील एका टपरीसमोर गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री 8.00 पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलाचा यश ढाका (वय 22) याचा खून झाल्याची घटना घडली. या घटनेने जिल्हा रुग्णालय व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. यामुळे रात्री काही तणाव निर्माण झाला होता.
गुरुवारी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील अंबिका चौकात काही युवकांमध्ये बचाबाची झाली. तेथून यश ढाका त्याचे दोन मित्र नगरनाका मार्गावरून माने कॉम्प्लेक्स परिसरात गेले. बाचाबाची झालेले काही जण त्याच्या मागे गेले. तेथेही बाचाबाची झाली. त्यानंतर अटॅक झाल्याने यश याचा पाठलाग करत त्याच्यावर वर करण्यात आले. यामध्ये यश देवेंद्र ढाका (वय 22) वर्ष याच्या छातीवर व पोटावर चाकूचे वार करण्यात आले. छातीत आरपार चाकूचे वार गेल्याने तो जमिनीवर कोसळला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले.दरम्यान पोलिसांनी घटनेच्या अर्ध्या तासातच आरोपीला जेरबंद केले आहे. यश पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा तो मुलगा आहे. शहरात गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यश देवेंद्र ढाका वय २२, रा. बीड या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली आहे. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेत होता. वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
गुरूवारी रात्री शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून झाला असल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट झाला आहे . दरम्यान या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासात सुरज आप्पासाहेब काटे वय 21 वर्ष रा.. बीड या आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक किशोर पवार, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पेठ बीड पोलीस ठाण्याचे अशोक मुदिराज आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटना स्थळी घेऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.