मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. या आंदोलनावरुन नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. यावरुन मनोज जरांगेंनी खरपूस टीका केली आहे.
राज ठाकरेंच्या म्हणण्यावर बोललो. दोघे भाऊ चांगले. ब्रँड चांगला आहे. हा विनाकारण मराठ्यांच्या मध्ये पडतो. ११ ते १३ आमदार निवडून दिले. ते पळून गेले. आम्ही विचारलं का. फडणवीसांनी लोकसभेला तुझा गेम केला. विधानसभेला तुझ्या मुलाला त्यांनीच पाडलं. तरी आम्ही विचारलं का. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. हुरळून जातात. कुचक्या कानाचं म्हणतात. तुम्ही नाशिकला गेला. आम्ही विचारलं का. पुण्याला गेला आम्ही विचारलं का. तुम्ही संभाजीनगरला येता आम्ही विचारलं का.