वाल्मिक कराडची प्रकृती खालावली

वाल्मिक कराडांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाल्मिक कराडांची सीआयडी कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र त्याच दरम्यान त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडांना मकोका लागताच त्यांचा ताबा घेण्यासाठी एसआयटीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून एसआयटीला वाल्मिक कराडांचा ताबा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता उद्या त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वाल्मिक कराडांवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. याचदरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा ईसीजी काढण्यात आला आहे.

मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर हत्याप्रकरणात त्यांचा ताबा घेण्यासाठी एसआयटीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून एसआयटीला वाल्मिक कराडांचा ताबा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा ईसीजी काढण्यात आला आहे.

.

error: Content is protected !!