गुणरत्न सदावर्ते यांचे वक्तव्य
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “एक अत्याचारी व्यवस्था आहे. त्या चष्म्यातून पाहण्याची सवय झालेली असते. पुरुष प्रधान विचारांची मुलं आहेत. ही धसांसारखी फळं आहेत. तुम्ही एखाद्याला न्याय मिळण्याची भाषा करता, पण दुसरीकडे अभिनेत्रीला लज्जा उत्पन्न व्हावी, अशी भाषा करता. एकच नाही, दाक्षिणात्य अभिनेत्री आहे, उत्तर भारतातील अभिनेत्री देखील आहे. वंदनीय आणि पुजनीय भगवानबाबा यांच्याही वेदना आम्ही विसरू शकत नाही.”
महिला आयोगाने दिली पाहिजे वार्निंग – गुणरत्न सदावर्ते
पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “अरे बाबा धस, दोन आठवडे झाले नसतील आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर असं कृत्य करणे. हे जीभ घसरली म्हणून नाही तर मुद्दामहून आहे. महिला आयोगाने त्यांना वार्निंग दिली पाहिजे. त्यांना दंड ठोठावण्यात आला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एखाद्या महिलेची टर उडवणे, हे तिच्या अब्रूचे नुकसान आहे. जुन्या आणि नव्या कायद्यानुसार धसांना शिक्षा होऊ शकते. सभापती महोदय सुद्धा त्यांना शिक्षा देऊ शकतात. एखाद्या महिलेप्रती केलेला हा अपमान आहे. हे धसांना कोण शिकवणार आहे? धसांना सामान्यांच्या जमिनीची मोजणी वाटते. माझ्या वंजारी भावांच्या जमिनी मोजल्या जातात. सराटीमध्ये बसलेल्यांची लोक रेती काढून नेतील.”