नवी दिल्ली : भारतीयांना मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायला भाग पाडण्याचे सारे श्रेय ‘बिग बाजार’ला जाते. आज बिग बाजाराची पॅरेंट कंपनी ‘फ्यूचर रिटेल’ ( future retail ) कर्ज बाजारी झाली आहे. ‘बिग बाजार’चा ( big bazaar ) सेल आणि त्याच्या जाहीराती यांना आकर्षित होऊन एकेकाळी इतकी गर्दी लोटायची कि त्यांना हाताळणे मोठ्या कौशल्याचे काम होते. एका मुलाखतीत किशोर बियानी यांनी मॉलची गर्दी कशी हाताळली याचे सारे श्रेय तिरूपती बालाजीला दिले आहे. आज ‘बिग बाजार’ केव्हाही विकली जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. किशोर बियानी यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीचा रूबाब मात्र कायम आहे.
आजही शॉपिंगला जाताना ‘बिग बाजार’ चे नाव तोंडावर येते. किशोर बियानी यांच्या नेतृत्वाखालील बिगबाजार रिटेल चेन एकेकाळी या क्षेत्रातील दादा कंपनी होती. बिग बाजारात आपल्या गरजेच्या साऱ्या वस्तू एका जागी मिळायच्या. बिगबाजार सेलच्या जाहीराती पाहून शॉपिंगसाठी मोठी गर्दी उसळत असायची त्यामुळे या गर्दीला मॅनेज कसे करायचा असा सवाल त्यांना एका पॉडकास्टमध्ये करण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की ते आंध्रप्रदेशातील तिरूपती बालाजी मंदिरात तेथील गर्दी कशी मॅनेज केली जाते हे पाहण्यासाठी खास तेथे गेले. तेथून क्राऊड मॅनेजमेंटचे धडे शिकून घेतले. तेथील तंत्र बिग बाजार स्टोअर्समध्ये वापरण्यात आले. त्यामुळे बिग बाजारची गर्दी मॅनेज करायला जमल्याचे त्यांनी सांगितले.
जेरोधाचे को फाऊंडर निखिल कामथ यांच्या पॉडकास्ट सिरीजच्या नव्या एपिसोडमध्ये त्यांनी फ्यूचर ग्रुपच्या किशोर बियानी यांची खास मुलाखत घेतली. बुधवारी सकाळी या मुलाखतीचा ट्रेलर जारी झाला आहे. निखिल कामथ यांनी किशोर बियानी यांना इंडीयन रिटेलचा GOD FATHER म्हटले आहे. या मुलाखतीत जीवन फार अवघड नाही. केवळ स्वत: वर आत्मविश्वास असायला हवा असा सल्ला त्यांनी दिला आहे.