जितेंद्र आव्हाड कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाराष्ट्रा वणवा पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना गोळी देऊन झोपविले जात आहे, असा घणाघाती आरोपही आव्हाड यांनी केला आहे. शरद पवार यांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही आव्हाड यांनी विरोधकांना दिला आहे.