पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक

PM मोदी काय निर्णय घेणार ?

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने कहर ( Covid Cases In India ) केला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदींनी संध्याकाळी ४.३० वाजता ही उच्चस्तरीय बैठकीत बोलावली ( pm modi to review the covid 19 situation ) असून देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तिसऱ्या लाटेच्या तयारीचाही ते आढावा घेणार आहेत. देशातील पॉझिटिव्हिटीचा दर १० टक्क्यांवर गेला आहे. अशा परिस्थितीत संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनसारखी कठोर पावले उचलण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी देऊ शकतात.

यापूर्वी पंतप्रधान मोदींनी २२ डिसेंबर आणि २६ नोव्हेंबरला करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. दोन्ही बैठकीत पंतप्रधानांनी चाचणी, ट्रेसिंग आणि उपचारांवर भर दिला आहे. औषधे आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी सूचना केल्या होत्या.

सुप्रीम कोर्टात करोनाची एन्ट्री

करोनाचा संसर्ग सुप्रीम कोर्टातही वाढला आहे. सुप्रीम कोर्टात ४ न्यायाधीशांना करोनाचा संसर्ग झाला आहे. याआधी कोर्टात गुरुवारी दोन न्यायाधीश पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याशिवाय रजिस्ट्रीमधील १५० कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी आठवड्यातून तीन दिवसच शारीरिक उपस्थितीत प्रकरणांची सुनावणी केली जाईल, असे गुरुवारीच स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!