पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा

मागच्या काही दिवसांपासून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. तसेच करुणा मुंडे यांच्या बहिणीने धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. कालांतराने त्यांनी ही तक्रार मागे घेतली होती.अशातच आता धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

यावेळी करुणा मुंडे (karuna dhanjay munde) म्हणाल्या की, धनंजय मुंडे माझे पती आहेत आणि ही वस्तुस्थिती अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मुंडे यांनी स्वतः याची कबुली दिली आहे. मी धनंजय मुंडे यांची नेमकी कितवी पत्नी आहे हे समोर येऊ नये म्हणून माझं तोंड बंद करण्यात आलं आहे. न्यायालयातून माझ्यावर बंधने आणली गेली आहेत. मला ट्रोल करणाऱ्या लोकांना ५-६ बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो.

मात्र २५ वर्षांपासून आपल्या पतीशी एकनिष्ठ असणारी स्त्री वेश्या वाटते. हा तुमच्या नजरेचा दोष आहे. तुमच्यामध्ये खरंच हिम्मत असेल तर त्या व्यक्तीला माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा. हे निर्बंध हटवल्यास मी मीडियासमोर येऊन सर्व सत्य सांगेल, अशी चेतावणी देखील करुणा मुंडे यांनी दिली आहे. तसेच इतरांच्या बायकांप्रमाणेच मी सुद्धा नवऱ्याचा पैसा खर्च करते. त्यातूनच समाजसेवा करते हे खरं आहे. कोणत्याही महिलेला केव्हा ललकारु नका. मी लवकरंच पुन्हा लाईव्ह येऊन ट्रोलर्सच्या प्रश्नांची उत्तरं देईल.

error: Content is protected !!