24 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम
राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली की, मागच्या दोन आठवड्याशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र अद्यापही 24 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम आहे. ही कोरोनाची वाढ कमी करणे हे टार्गेट आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.