आठ दिवसापासून जिल्ह्यात बाधितांचा आकडा हजाराच्या पुढे
बीड, अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात बाधितांचा आकडा हजाराच्या पुढे रोज वाढतांना दिसून येत आहे. काल जिल्ह्यातून 4 हजार 397 संशयितांचे स्टॅब तपासणीसाठी पाठवले असता आज दुपारी 4 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 3 हजार 100 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले तर 1 हजार 297 जण कोरोना बाधित आढळून आले. सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 206, आष्टी 138, बीड 313, धारूर 52, गेवराई 84, केज 171, माजलगाव 44, परळी 85, पाटोदा 77, शिरूर 82, वडवणी तालुक्यता 45 बाधितांचा समावेश आहे. आज बीड, अंबाजोगाई, केज, आष्टी या ठिकाणी सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत..