परळी ग्रामीण रुग्णालयातील 50 बेडचे कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी सज्ज

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते रविवारी उद्घाटन

(२४ एप्रिल) परळी : परळी तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्य सह अन्य यंत्रणा कामाला लावून परळी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्या (रविवार दि. 25) धनंजय मुंडे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्षद शेख यांनी दिली. प

रळी ग्रामीण रुग्णालयात सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करता यावेत, यासाठी आवश्यक सामग्री दोन दिवसात उभारण्यात आली असून, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी आवश्यक कार्यवाही पार पाडली. दरम्यान या 50 बेडच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय रुग्णालयात दाखल होणाऱ्या नियमित रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नाही, उद्या (रविवार) पासून येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात होणार असल्याचेही डॉ. शेख म्हणाले.

error: Content is protected !!