गॅस लिकेज होऊन घरास लागली आग; लाखोंचे झाले नुकसान!

लाखोंचे झाले नुकसान!

घरगुती स्वयंपाकाचा गॅस लिकेज होऊन घरास आग लागुन लाखोंचे नुकसान झाल्याची घटना तेलगावपासुन जवळच असलेल्या भोपा तालुका धारूर येथे बुधवारी घडली.

भोपा येथील शेख अन्वर शेख बशीर यांच्या पत्नी बुधवारी रात्री घरात गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक गॅस गळती होऊन कांही क्षणात आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्यासह इतर सामान जळुन शेख यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

error: Content is protected !!