भारतीय जनता पार्टीला जेव्हा कुणी विचारतही नव्हतं, तेव्हा…..

बीड । भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी पक्षबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. “भारतीय जनता पार्टीला जेव्हा कुणी विचारतही नव्हतं, तेव्हा त्या पक्षाचं काम आपल्या कुटुंबानी केलं”, असे उदाहरण देत भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी माजलगाव येथील कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना दिले आहे. माजलगाव येथील शेतकऱ्यांच्या गूळ उत्पादक उद्योगाच्या उदघाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

प्रीतम मुंडे म्हणाल्या की, “तुम्ही तुमच्या बोलण्यातून जसं सांगितलं की तुमच्या पूर्वीच्या अनुभवातून तुम्ही ज्या गोष्टी पडलेल्या आहेत त्यांना उभं करण्याचं ट्रेनिंग घेतलं आहे. त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. गुळाचा तो उपयोग आहेच. पण भारतीय जनता पार्टीला जेव्हा कुणी विचारत नव्हतं, त्यावेळी भाजपचं काम आपल्या कुटुंबाने केलं आहे. त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टीकोनाने बघत होते. तो पक्ष टिकाऊ झाला आहे. आज सगळ्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये भाजप पक्ष फुललेला दिसत आहे”, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

पुढे प्रीतम मुंडे म्हणाल्या, “आपलं भविष्य उज्ज्वल आहे. जसं पक्षाचं भविष्य उज्ज्वल आहे. तसंच तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल आहे.” दरम्यान, प्रीतम मुंडेंच्या या वक्तव्याची मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!