कोरोना लस वितरणाचा प्लॅन तयार, लसीचा आपत्कालीन वापरही होणार; : आदर पुनावाला

पुणे: कोरोना लसीचा आपत्कालीन वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात येणार असल्याचं आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोना लस वितरणाचा प्लॅनही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी कोरोना लसी संदर्भात आज अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीची निर्मिती सुरू असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. आदर पुनावाला आणि सिरममधील संशोधकांकडून त्यांनी लसीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन यााबाबतची माहिती दिली. कोरोना लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून परवानगी घेण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यात लायसन्सची मागणी करण्यात येणार असल्याचं पुनावाला यांनी सांगितलं.

हे वाचा : कंगनाने पुन्हा सुरू केला वाद, ‘महाराष्ट्र सरकारपेक्षा तर आदित्य पांचोली, हृतिक रोशन बरे’

कोरोना लसीची अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्याचं सर्वात आधी वितरण भारतात करण्यात येईल. त्यानंतर आशिया खंडात या लसीचं वितरण करण्यात येणार आहे. आमच्याकडे कोरोना लसीच्या वितरणाचा प्लॅनही तयार आहे. येत्या जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींच्या निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाची लस तयार झाल्यावर त्याची घोषणा आरोग्य मंत्रालायकडूनच केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लसीच्या किमतीवर चर्चा नाही
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिरममधील लस निर्मितीबाबतचा आढावा घेतला. त्यांच्याशी कोरोना लसीवर सखोल चर्चा झाली. लसीकरणाच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. तसेच लसीकरणाच्या साठवणुकीचा आढावाही त्यांनी घेतला. मात्र कोरोना लसीच्या किमतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. मोदींचा दृष्टीकोन अत्यंत समतोल वाटला. मोदींना लसीबाबतची खूप माहिती आहे. ते विविध लसींबद्दल भरभरून बोलत होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
पंतप्रधान मोदींना लसीसंबंधीची खूप माहिती
मोदी विविध लसींबद्दल भरभरून बोलले
लसीकरणाच्या वितरणाचा प्लॅन तयार
युरोपियन देशही अॅस्ट्रा झेनेकोवर लक्ष ठेऊन
कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी 2 आठवड्यात परवान्यासाठी अर्ज करणार
लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात

error: Content is protected !!