PUBG Mobile India च्या वेबसाइटवर आली गेमची डाउनलोड लिंक…

चीनसोबत सीमेवर झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये PUBG Mobile गेमला देशभरात बॅन केले होते. PUBG Mobile Game इंडियन मार्केटमध्ये लवकरच पुन्हा एंट्री होणार आहे. यावेळी PUBG Mobile India नावाने हा गेम भारतीय युजर्ससाठी उपलब्ध होईल.

PUBG Mobile India हा गेम वर्षाअखेरपर्यंत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. कारण PUBG Mobile च्या वेबसाइटवर डाउनलोड लिंक आणि एक पेज काही दिवसांपूर्वी दिसलं होतं असं काही युजर्सनी सांगितलंय. पण थोड्याच वेळात ही लिंक हटवण्यात आली. काही खेळाडूंना अधिकृत वेबसाइटवर गेमची APK डाउनलोड लिंक देखील दिसत होती, पण ती लिंक काम करत नव्हती.

याशिवाय PUBG Mobile चा नवीन लोगोही यावेळी दिसून आला, असं काही युजर्सचं म्हणणं आहे. पण, आता हे सेक्शन अधिकृत वेबसाइटवरुन गायब झालं आहे. मात्र, यामुळे लवकरच गेमच्या लाँचिंगची तारीख समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्विटरवर काही युजर्सनी डाउनलोड लिंकबाबत ट्विटही केलेत.

भारतीय बाजारात पबजी मोबाइलचं स्पेशल व्हर्जन लाँच होणार आहे. पबजीने भारतीय गेमिंग इंडस्ट्रीमध्ये 100 मिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. पबजी कॉर्पोरेशनची पॅरेंट कंपनी Krafton Inc भारतात 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

ही गुंतवणूक भारतात गेम्स, ई स्पोर्ट्स, एंटरटेन्मेंट आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. पबजीने भारतीय बाजारात पुनरागमन केलं असून चिनी कंपनी टेन्सेंट गेम्ससोबतचा करार तोडला आहे. मात्र अद्याप पबजी कॉर्पोरेशनने लाँचिंगच्या तारखेची घोषणा केलेली नाही. पबजी मोबाइल इंडियाला खास भारताच्या दृष्टीकोनातून बनवण्यात आलं असून लवकरच लाँच केला जाईल असं कंपनीने जाहीर केलंय.

error: Content is protected !!