‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये अजित पवार

अजित पवार काम करत असतानाचा लाइव्ह व्हिडीओ खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. करोनावर मात करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा कामावर रुजू झाले आहेत. आज, मंगळवारपासून अजित पवार यांनी मंत्रालयातून आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मागील आठ दिवसांपासून अजित पवार घरीच विश्रांती घेत होते . आता पुन्हा एकदा त्यांनी आपलं कामकाज सुरु केलं आहे. नेहमीप्रमाणे मंत्रालयातील आपल्या दालनात अजित पवार सकाळी दाखल झाले होते. हातात ग्लोज आणि तोंडावर मास्क बांधून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादा काम करत असताना एक व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला आहे.

या व्हिडीओमध्ये असं दिसतेय की, खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना एक निवेदन दिलं. त्यावर सही करण्यासाटी ते पेन शोधत होते तेव्हा सुप्रिया सुळेंनी आपल्याकडील पेन दिला. त्यावेळी ‘माझ्या पेनमध्ये सॅनिटाझर आहे’, असं सांगत अजित पवार यांनी चेष्टा केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डॉक्टरांनी तुम्हाला काम करण्यास सांगितले आहे का? यावर अजित पवार म्हणाले की, ‘आज मंत्रालयात काम करणार आहे. त्यानंतर बारामतीला जाईल.’

error: Content is protected !!