मराठा समाजाच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष :-राजेंद्र आमटे

बीड (प्रतिनिधी) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समाजातील अनेक तरुणाने प्राणाची आहुती दिली कै अण्णासाहेब पाटील यांच्या सह अनेक तरुण हुतात्मा झाले या मुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरीही शासन मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी योग्य वकील लावणे,शासनाने मराठा आरक्षण संदर्भात योग्य पुरावे सादर करणे या सर्व कामात सरकार बघ्याची भूमिका घेत आहे ,मराठा आरक्षण आंदोलनात तरुणावर दाखल करण्यात आलेले गुन्हे माघे घेतलेले नाहीत ,मराठा आंदोलनात हुतात्मा झालेल्या तरुणांना 10 लक्ष रुपये, व शासकीय नोकरी देण्याची शासनाने घोषणा करून अजूनही हुतात्म्यांनच्या कुटूंबाला कसलीही मदत मिळाली नाही अश्या एक नव्हे अनेक प्रश्न शासन दरबारी असून शासन मराठा समाजाच्या प्रश्न साठी वारंवार दुर्लक्ष करत आहे
शासनाने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तात्काळ कारवाईचे करून मराठा समाजाच्या मागण्या सोडाव्यात अन्यथा मराठा समन्वय समितीअध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या वतीने बीड तहसीलदार यांना निवेदन देऊन इशारा देण्यात आली या वेळी शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,सरचिटणीस प्रशांत डोरले, सौरभ तांबे,बाळू झनझाने यांच्या वतीने निवेदन देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!