बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन असलेल्या पाच शहरातील व्यापार्यांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये परळी, केज, माजलगाव, अंबाजोगाई आणि आष्टी या शहरांचा समावेश आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. बीड, गेवराईप्रमाणे त्या पाच शहरातही 18, 19 आणि 20 ऑगस्ट अशी तीन दिवस व्यापार्यांची अँटीजेन टेस्ट होणार आहे. त्याअनुषंगाने या शहरातील व्यापार्यांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार, सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.
वाढत चाललेला हा आकडा कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाने सुरूवातीला गेवराई त्यानंतर बीडमधील व्यापार्यांची अँटीजेन टेस्ट केली. यामध्ये अनेक व्यापार्यांना कोेरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले
जिल्हा प्रशासनाने सध्या लॉकडाऊन असलेल्या परळी, अंबाजोगाई, माजलगाव, केज आणि आष्टी शहरातही व्यापार्यांची अँटीजेन टेस्ट करण्याचे तगडे नियोजन केले आहे. ही टेस्ट दि. 17 ऑगस्टपासून होणार होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आता या पाचीही शहरात 18, 19 आणि 20 ऑगस्ट अशी तीन दिवस अँटीजेन टेस्ट होणार आहे, त्यानुसार या पाची शहरातील सर्वच व्यापार्यांनी आपली अँंटीजेन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार, सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.