बीड: विषाणूच्या प्रादुर्भाव वाढू नये आणि पोलीसांच्या आरोग्याची सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आज दि.15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 09:50 वा. 74 व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून बीड पोलीस दलाच्या स्वतंत्र विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या विलगीकरण कक्षाच्या उध्दघाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे मा.ना.पालकमंत्री धनंजय मुंडे हे लाभले,त्यांच्या शुभहस्ते उध्दघाटन करण्यात आले.या स्वतंत्र विलगीकरण कक्षामध्ये ज्या पोलीस बाधवांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, पण त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशा अलक्षणीय कोरोना संसर्ग पोलीस रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. जेणे करून त्यांचा त्यांच्या कुटुंबीयाशी किंवा इतरांशी संपर्क येणार नाही व इतरांना संसर्गाचा धोका वाढणार नाही. हा कोव्हिड विलगीकरण कक्ष पोलीस मुख्यालय बीड या ठिकाणी उभारण्यात आला आहे.
हे वाचा– बिंदुसरा धरण 98%भरले नदी पात्रातील नागरिकांनी सतर्क राहावे-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर
त्यामध्ये 52 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या विलगीकरण कक्षाचे कामकाज व नियंत्रण ‘बीड पोलीस कोव्हिड सेल’ यांच्या मार्फत या सेल चे प्रमुख सपोनि श्री योगेश खटकळ पाहत आहेत.या विलगीकरण कक्षाचे नाव ‘आत्मनिर्भर’ असे देण्यात आले आहे.
हे वाचा- उस्मानाबाद येथे विविध पदांच्या भरती २०२०.
या उध्दघाटन कार्यक्रमाच्या वेळी मा.जिल्हाधिकारी राहूल रेखावार मा.पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, मा.आ. विनायकराव मेटे, मा.आ.संदीप क्षिरसागर, पोलीस उप अधीक्षक (गृह) स्वप्निल राठोड तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.