Unlock ST Bus and coching classes राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा आणि कोचिंग क्लासेस सुरु करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केली.कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून प्रारंभ करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.
वडेट्टीवार यांनी ऐन संकट काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. प्रसंगी मेस्मा लावला जाणार आहे. चंद्रपूर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील 5 डॉक्टरांना याचसाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.