मुंबई | सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे. सोन्याचा दर 70 हजार रूपयांचा टप्पा पार करु शकतो, असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.
गेल्या महिन्यात सोन्याचे दर 40 टक्के वाढले. त्यामुळे बाजारात सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 50 हजार रूपयांवर गेला होता. त्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीकरांचाही कल मौल्यवान धातूकडे वाढला आहे.
हे वाचा- दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय.
आंतराष्ट्रीय बाजारामध्ये मागिल दोन वर्षात ही दरवाढ 75 टक्के इतकी होती, मात्र 2020 मध्ये सोन्याच्या दरवाढीत फक्त 30 टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून लोकं सोनं खरेदी करण्याला जास्त प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सोन्याचे दर भविष्यात आणखी वाढण्याची शक्यताही तज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे बेरोजगारीचे प्रमाण वढतं आहे. यामुळे सर्वसामान्यांची मारामार होतं असल्याचंही दिसून येत आहे.