लसूण…. आमच्या मते असा कोणताच व्यक्ती नसले ज्याला लसूण म्हणजे काय हे माहीत नसेल, सर्वांनाच लसूण विषयी माहिती आहे. परंतु काय माहीत आहे..? हेच ना की, आपण लसूण चा उपयोग आपल्या जेवणात करतो, फोडणी टाकण्यासाठी, पेस्ट बनवण्यासाठी अशा अनेक प्रकारे रोज लसणाचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का की याच लसणाचा उपयोग जर आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाण्यासाठी केला.
तर त्यापासून आपल्याला भरपूर फायदे होऊ शकतात, तर चला आम्ही तुम्हाला या विषयी आणखी माहिती सांगतो. लसूण ही कांद्याची एक प्रजाती आहे. या वनस्पतीला तीव्र वास आहे ज्यामुळे त्याला औषधाचा दर्जा देण्यात आला आहे. लसूणला जगभरात मसाले, चटणी, सॉस, लोणचे आणि औषध म्हणून वापरली जाते. लसूण मध्ये vitamin A, vitamin B, Vitamin C असतात, तसेच potassium, calcium, iron, iodine, magnesium, यांसारखी पोषक तत्वे भेटतात. लसूण शरीरातील इन्सुलेन चे प्रमाण वाढवते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. लसूणचे कॅलरीफिक मूल्य 175 आहे.
यामध्ये पाणी 42%, प्रथिने 4.3%, स्टार्च 29.9%, खनिजे 2%, तंतू 0.6%, चरबी 0.2%, कॅल्शियम 30 मिली ग्रॅम, फॉस्फरस 329 मिली ग्रॅम, 2.3 मीली ग्रॅम, विटामिन 23 मिली ग्रॅम, विटामिन बी कॉम्प्लेक्स कमी प्रमाणात आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना पुढे सांगितलेली कृती वापरून लसणाचे सेवन करावे नक्कीच त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवणे शक्य होईल. एक ग्लास पाण्यामध्ये चार मोठ्या साईजच्या लसूणच्या पाकळ्या टाकून ते पाणी आठ ते नऊ मिनिटे उखळून घ्या आणि थोड्या वेळाने ते पाणी कोमट झाल्यानंतर प्या, आणि या लसूणच्या पाण्यामुळे तुमच्या जर पोटाशी.
संबंधित कोणती तक्रार असेल तर त्या तक्रारीपासू आराम मिळेल, तसेच या पाण्याच्या सेवनाने शरीरामधील घातक पदार्थ बाहेर टाकले जातात. लसूण नियमित खाल्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते, आणि लसूणच्या सेवनाने पचन शक्ती सुद्धा चांगली राहते, ज्यांना अपचनाचा त्रास आहे किंवा ज्यांना कमी भूक लागते, अश्या व्यक्तींमध्ये रिकाम्या पोटी लसूण चावून खाणे खूप फायद्याचे ठरते. तसेच सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसूण खाल्याने. लसूण तुमच्या हृदयरोगाशी संबंधित तक्रार दूर करण्यासाठी देखील मदत करते, लसूण खाल्ल्याने रक्याच्या गाठी बनत नाहीत.
तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची तक्रार देखील कमी होते. डायरीत किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्टता या दोन्ही पोटाच्या तक्रारी मध्ये लसूण उपयोगी पडतो, आणखीन एक महत्वाचे म्हणजे ज्या लिकांना हृदयाच्या आजाराच्या दृष्टीने रक्त पातळ होण्याची गोळी सुरू आहे अश्या लोकांनी जास्त कच्च्या लसूणचे सेवन करू नये, कारण लसणामध्ये देखील रक्त पातळ करणारे तत्वे असतात. त्यामुळे अशा लोकांनी जास्त लसूण खाऊ नये, आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे लसूण मध्ये अँटी बॅक्टेरियल आणि वेदना कमी करणारे तत्वे असतात ज्यामुळे श्वासनासी संबंधित विकारांसाठी लसूण.
खाल्याने खूप फायदा होतो. तसेच खोकला, अस्थमा, किंवा ब्रँकायटीस यामध्ये लसणाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. कर्करोगासाठी लसूण खूप फायदेमंद ठरतो लसणाच्या नियमित वापरामुळे पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते आणि कर्करोगाच्या पेशींची वाढ १३९% कमी होते. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.