पुतळादहनाची परंपरा नाही, देशभरात या ठिकाणी होते रावणाची पूजा

असत्यावर सत्याचा, वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा करण्यात येतो. याच दिवशी प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. मात्र, देशात काही ठिकाणी रावणाची मंदिरे असून त्या ठिकाणी रावणाच्या पुतळा दहनाची परंपरा पाळण्यात येत नसून रावणाची पूजा करण्यात येते.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील बिसरख गावात रावणाचे मंदिर असून भक्तीभावाने आणि श्रद्धेने रावणाची पूजा करण्यात येते. बिसरख गाव रावणाचे आजोळ असल्याची मान्यता असल्याने याठिकाणी रावणाचे मंदिर असून गावकरी रावणाची पूजा करतात आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येत नाही.

error: Content is protected !!