भीषण अपघातात महिला जागीच ठार

सांगली-माधवनगर बायपासरोड वरील पट्टणशेट्टी होंडाच्या समोर ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार महिला जागीच ठार झाली. मयत महिलेचे नाव बेबीजान रसुल मुल्ला वय 42 रा. अहिल्या नगर असे आहे. सदर महिला एम एच 10- 6565 या दुचाकीवरुन जात असताना या महिलांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली .

हे वाचा : बॅट फेकणं गेलला पडलं महागात

या अपघातांमध्ये महिलेला डोक्याला गंभीर मार लागल्याने ती जागीच ठार झाली. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. ही घटना सीसीटीवी मध्ये कैद झालेली आहे. याचा तपास सांगली शहर पोलिस ठाणे हे करत आहे.

error: Content is protected !!