सुशांत सिंह राजपूत प्रकरणी: नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput case) चित्रपट निर्माता संदीप सिंह (Sandip Singh) संदर्भात काँग्रेस आक्रमक झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत संदीप सिंह याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. या वरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) हल्लाबोल केला आहे. संदीप सिंह याला कोण वाचवत आहे, असा प्रश्न विचारत एकाद्या संशयित व्यक्तीचा संबंध जेव्हा एका सत्तारुढ पक्षाशी असतो, तेव्हा संदीप सिंहचे संबंध भाजपत कोणाशी जुळलेले आहेत, याबाबच माहिती मिळाली असे संपूर्ण देशाला वाटत आहे, असे सिंघवी म्हणाले.

हे वाचा : काँग्रेसच्या बैठकीत आम्हाला पक्षद्रोही ठरवले गेले

गडकरी आणि फडणवीसांना काँग्रेसचे प्रश्न

सिंघवी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षाची बाजू मांडताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सिंघली म्हणाले की, ‘संदीप सिंह हा एकमेव असा चित्रपट निर्माता आहे, ज्याच्यासोबत व्हायब्रंट गुजरात २०१९ मध्ये १७७ कोटी रुपयांचा करार करण्यात आला. लीजेंड ग्लोबल स्टूडिओ (global studio) असे कंपनीचे नाव आहे. या कंपनीला सन २०१७ मध्ये ६६ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच कंपनीला सन २०१८ मध्ये ६१ लाखांचा फायदा आणि सन २०१९ मध्ये ४ लाखांचा तोटा सहन करावा लागला होता. हा करार कसा झाला?, या मुळेच इतक्या सगळ्या हालचाली सुरू आहेत?, मॉरिशसचा प्रश्न कसा सुटला?, संदीप सिंहला चरित्रपट कसा काय देण्यात आला?, संदीप सिंहने महाराष्ट्र भाजप कार्यालयात ५३ कॉल कसेकाय केले?, कोण आहे तो नेता?, माननीय फडणवीस आणि गडकरी यांनी हे सांगावे.’

भाजपचा खास आहे संदीप सिंह: सिंघवी

आपण सुशांतसिंह राजपूतचे जवळचे मित्र आहोत, असा दावा संदीप सिंह याने अनेकदा केल्याचे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. याच संदीप सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट बनवला होता. याचाच अर्थ संदीप सिंह हा एक अतिशय जवळचा, विशेष आणि प्रिय व्यक्ती आहे. त्या चित्रपटाच्या पोस्टर्सचे लोकार्पण करण्यासाठी त्या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. याचाच अर्थ संदीप सिंह ही काही सर्वसाधारण व्यक्ती नाही, असे सिंघवी म्हणाले. याच संदीप सिंहने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र भाजप कार्यालयात ५३ कॉल केले होते?… तो कोणाकडून सुरक्षा मागत होता?, असे प्रश्नही सिंघवी यांनी विचारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!