महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2018मध्ये रैनानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
रैनाने त्याच्या निवृत्तीबाबत सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रैना म्हणतो, “माझी मी तुझ्यासोबत खेळलो. हा प्रवास फार चांगला होता. फार अभिमानाने मी देखील तुझ्यासोबत हा पुढचा प्रवास करणार आहे. धन्यवाद! जय हिंद.” याचसोबत रैनाने धोनीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
कर्णधार असताना धोनीने रैनाच्या या गुणांना हेरून त्याचा चांगला उपयोग करून घेतला होता. आता धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्याच दिवशी रैनानेही तीच वाट धरली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या काही खेळी लक्षात राहणाऱ्या आहेत. वन डे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात त्याचं स्थान लक्षात राहण्यासारखं होतं. त्याने त्या स्पर्धेत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. आता धोनीबरोबरच रैनाने सुद्धा क्रिकेट संन्यास जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांना आणखी हुरहूर लागली आहे.