भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी अचानक घेतलेली निवृत्ती ही सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. सोशल मीडियावर ती याचे वेगळीच चर्चा रंगली आहे की धोनीने का अचानक निवृत्ती घोषित केले?
हे वाचा – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश; वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार
मार्च एप्रिल महिन्यात आयपीएलचे सामने खेळल्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेत उतरण्याचा धोनीचा प्लॅन होता. दुसऱ्यांदा भारतीय संघाला टी-20 विश्वचषकात चॅम्पियनशीप मिळवून देत आनंदाने निवृत्तीही घोषित करण्याचं धोनीने ठरवलं होतं, असं माजी क्रिकेटर सुनिल गावसकर यांनी सांगितलं आहे.
कोरोना महामारीमुळे धोनींच सगळं नियोजन कोलमडलं. त्यातच, यंदाच्या वर्षात सामने होणार नसल्याने मैदानात निवृत्ती घेणं शक्य नसल्याचे धोनीच्या लक्षात आलं. त्यामुळेच, धोनीने हीच ती वेळ म्हणत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली, असं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे.
हे वाचा –MPSC’चा मोठा निर्णय! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी धोनीने क्रिकेट सोडलेले नाही. धोनी आता आयपीएल खेळणे चालू ठेवणार आहे, असं बीबीसआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटलं आहे.