धक्कादायक: भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा ‘तिरंगा’ अन्…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला जात असताना गाडीवर उलटा तिरंगा पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांच्या सरकारी गाडीवर झेंडा लावला होता. मात्र तो उलटा होता. मिळालेल्या माहितीनुसार, देवास येथे एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली.

हे वाचा : भाजपा आमदाराचा सरकारला सवाल: मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?

उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र त्यांच्या सरकारी गाडीवर उलटा तिरंगा लावल्याची बाब प्रसारमाध्यमांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने ही गोष्ट मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर सुरुवातीला ठाकूर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र माफी मागितली. तसेच त्यानंतर सरकारी गाडीवर लावण्यात आलेला उलटा तिरंगा त्यांच्या ड्रायव्हरने सरळ केला. उषा यांची गाडी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आली होती.

इंदूरपासून देवासपर्यंत आलेल्या गाडीवर उलटा तिरंगा लावला होता. मात्र त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. देवासमध्ये जेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा उषा ठाकूर यांनी देखील आपली चूक मान्य केली. तसेच आपण नेहमीच राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मानाबाबत सतर्क असतो. राष्ट्रध्वजासाठी सर्व जीवन समर्पित आहे. त्यामुळे हा मुद्दा होता कामा नये असं ठाकूर यांनी यावेळी म्हटलं आहे.

राष्ट्रध्वजाबाबत जर कोणाकडून चूक झाली तर ती लगेचच सुधारण्याची आपली जबाबदारी आहे. जर पुन्हा अशी कोणाकडून चूक होऊन नये यासाठी त्या सतर्क राहणार आहेत. तसेच तिरंगा कसा लावावा याचं प्रशिक्षण देण्यात येईल असंही उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. सातत्याने प्रसारमाध्यमांनी तिरंग्यावर प्रश्न विचारले असता त्यांनी याबाबत माफी मागितली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!