भारतीय बाजारात Ampere Vehicles ने आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Reo Elite लाँच केली आहे. Ampere Vehicles ही कंपनी ‘ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड’ ची साहायक कंपनी आहे. कंपनीने Reo Elite ची किंमत 45,099 रुपये (एक्स शोरूम) ठेवली असून अवघ्या 1 हजार 999 रुपयात ही स्कुटर बुक करता येणार आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरुन ही स्कुटर बुक करता येईल, याशिवाय स्कुटरच्या खरेदीवर ग्राहकांना हेल्मेट देखील मोफत दिलं जाईल असं कंपनीने म्हटलं आहे.
हे वाचा : भाजपानं धमकी दिली अन् प्रवेश करुन घेतला
Reo Elite मध्ये एक 250 व्हॅटची मोटर असून लेड अॅसिड बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कुटर 55 ते 65 किलोमीटर धावू शकते असा कंपनीचा दावा आहे. 86 किलोग्राम वजन असलेल्या या स्कुटरच्या पुढील आणि मागील दोन्ही बाजूला 110 mm चे ड्रम ब्रेक आहेत. Ampere Reo Elite मध्ये LED डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, USB चार्जिंग पॉइंटसारखे फीचर्स आहेत. रेड, व्हाइट, ब्लू आणि ब्लॅक अशा चार रंगांमध्ये ही स्कुटर उपलब्ध आहे.
अॅम्पियरच्या माध्यमातून आम्ही वर्ल्ड क्लास मेड इन इंडिया आणि क्लिन मोबिलिटी सोल्यूशन्सचे पोर्टफोलिओ बनवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले असल्याचे ग्रीव्हज कॉटन लिमिटेड कंपनीचे एमडी आणि सीईओ नागेश बसावनहल्ली म्हणाले.