राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ

मुंबई | राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.  सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असं विधानभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे.

राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापूर्वी सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती. पण, त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे हे पुन्हा पाठवत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. “याबाबत कोणतेही खबरदारी घेताना राज्यातील सरकार दिसत नाही. अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयांवर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचे वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे,” असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे महिला अत्याचारांच्या विषयांवर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचं वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे, असं फडणवीसांनी पत्रात म्हटलंय.

कोणतीही घटना झाली तर केवळ आरोपीला अटक करून चालणार नाही, तर संबंधित दोषी अधिकार्‍यांवर सुद्धा कारवाई करायला हवी पण तसं कुठल्याही घटनेत झालेले दिसून येत नाही, असं फडणवीस म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!