नवी दिल्ली: मात्र मोदींची ‘मन की बात’ (man ki bat) अनेकांना पटलेली दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काल मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. लोकलसाठी व्होकल व्हा, याचा पुनरुच्चार मोदींनी केला. खेळण्यांच्या निर्मितीत देशाला अग्रेसर होण्याची संधी आहे. त्यामुळे यासाठी स्टार्टअप्स कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही मोदींनी केलं. भाजपाच्या (BJP) अधिकृत यूट्यूब चॅनलवरील आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे.
हे वाचा : कोरोना संदर्भात: राज्य सरकारचा मोठा निर्णय
पंतप्रधान मोदींनी रविवारी ‘मन की बात’मधून त्यांचे विचार मांडले. भाजपानं त्यांच्या अधिकृत यूट्यूब (Youtube) चॅनवरून ‘मन की बात’चा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून २४ तास झाले आहेत. सध्याच्या घडीला (३१ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) जवळपास २७ लाख जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आतापर्यंत १ लाख ९ हजार लोकांनी व्हिडीओ लाईक केला. तर डिसलाईक (Dislikes) करणाऱ्यांची संख्या ६ लाख ९४ हजार इतकी आहे. म्हणजेच डिसलाईक करणाऱ्यांचं जास्त आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी मोदींच्या ‘मन की बात’बद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर १ लाख १७ हजार कमेंट्स आल्या आहेत. यातल्या बहुतांश कमेंट्स नकारात्मक आहेत.