राजकीय वातावरण अमित शहांमूळे तापले….

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने खास रणनीती तयार केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून त्यापैकी 200 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं समोर ठेवलं आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कारणांमुळे भाजपने बंगालमधील वातावरण चांगलेच तापवले आहे.

हे वाचा : काँग्रेसने स्वबळावर लढावे- अध्यक्ष भाई जगताप यांचा स्वबळाचा नारा

देशाचे गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते. काल शहा यांच्या रोड शोला तिथे अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. याबद्दल आतापर्यंतचा हा सर्वात मोठा रोड शो असल्याचे ट्विट करत अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार देखील मानले आहेत.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील या ट्विटवर भाष्य करतांना नामुमकीन को मुमकीन करके दिखाने मे अमित शहा भाई ने एक उंचाई हासिल की है, असे म्हणत ते निश्चितच पश्चीम बंगालच्या जनतेला दिलेला विश्वास खरा करून दाखवतील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला एका सभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले,आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल असं भाकीत शाह यांनी केले आहे.

error: Content is protected !!