सोशल मीडियाच्या (Social Media)माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राची (Maharashtra) सुनियोजित बदनामी केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मराठी माणूस त्याचा अनुभव घेतच आहे.
हे वाचा : भाजप खासदार रवी किशन यांच्यावर जया बच्चन यांचा घणाघात
मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राची सुनियोजित पद्धतीने बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे. पुन्हा या गॉसिपिंगचा (Gossiping) कोणी त्यांच्या पद्धतीने समाचार घेतलाच तर तुमची ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळी मांजरे लगेच आडवी जातात. तथाकथित मुस्कटदाबीच्या बोंबा मारल्या जातात, असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) म्हटलं आहे.
सरकारी बंधनाचा भाग म्हणून खोटीनाटी टीका सहन करणे काही यंत्रणांना अपरिहार्य असले तरी सोशल मीडियावर (social media)चौखूर उधळणाऱ्यांनी या निर्बंधांचा गैरफायदा घ्यावा असे नाही. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती रामण्णा यांना हेच सुचवायचे असावे, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती रामण्णा यांनी जी खंत व्यक्त केली आहे ती न्यायाधीशांपुरती मर्यादित असली तरी आजकाल गॉसिपिंगला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. ना क्षेत्राचे बंधन, ना टीकेची मर्यादा. सोशल मीडियावर सक्रिय असणारे सगळेच बेभान आहेत असे नाही, पण बहुतांश मंडळींना कसलेच भान राहत नाही. न्या. रामण्णा यांनी व्यक्त केलेली खंत म्हणूनच महत्त्वाची ठरते. ती समजून घेण्याचा समंजसपणा सोशल मीडियावरील बेलगाम मंडळी दाखवतील का, हाच खरा प्रश्न आहे.
सध्या जमाना सोशल मीडियाचा आणि त्यावर सुरू असणाऱ्या धुमाकुळाचा आहे. त्याला ना निर्बंध ना मर्यादा. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती रामण्णा (Justice Ramanna) यांनी नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवत न्यायाधीशांच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.
मागील पाच-सहा वर्षांत तर या वाहिन्यांच्या जोडीला ‘सोशल मीडिया’ आला आणि गॉसिपिंगच्या नावाखाली निंदानालस्तीचे घोडे चौखूर उधळू लागले. त्याला ना निर्बंध ना लगाम. विषय कोणताही असो, सोशल साईटस् आणि सोशल मीडिया क्रिया-प्रतिक्रियांनी गच्च भरलाच पाहिजे असा जणू दंडकच झाला आहे.
पुन्हा त्यात जबाबदारीपेक्षा हक्काचा भाग जास्त असल्याने सगळाच कारभार बेभान आणि बेफाट असतो. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मराठी माणूस त्याचा अनुभव घेतच आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची सुनियोजित पद्धतीने बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे. पुन्हा या गॉसिपिंगचा कोणी त्यांच्या पद्धतीने समाचार घेतलाच तर तुमची ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळी मांजरे लगेच आडवी जातात. तथाकथित मुस्कटदाबीच्या बोंबा मारल्या जातात.