आता अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मिळणार 48 लाख

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तब्बल सहा वर्षानंतर 48 लाख रुपये मिळणार आहेत. अर्जदार आणि विमा कंपनीमध्ये याबाबत नुकतीच तडजोड झाली. त्या तडजोडीवर मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य न्यायाधीश पी.आर. अष्टुरकर यांच्या न्यायालयात शिक्का मोर्तब झाला. माधव (वय 41) (नाव बदलले आहे) असे त्याचे नाव आहे. माधव 3 फेब्रुवारी 2014 रोजी जंगली महाराज रस्त्यावरून दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी अचानकपणे चुकीच्या दिशेने आलेल्या चारचाकीने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. 3 फेब्रुवारी ते 15 मे 2014 या तीन महिन्याहून अधिक कालावधीसाठी तो रुग्णालयात ऍडमिट होता. डिस्जार्जनंतर त्याला घरी नेण्यात आले. त्यावेळी उपचारासाठी 15 लाख रुपये खर्च आला होता.

हे वाचा : डॉ.गंगाधर मुंडे यांचे र्‍हदयविकाराने निधन

त्यानंतर मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे इंजुरी क्‍लेम दाखल करण्यात आला. त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने 6 सप्टेंबर 2014 रोजी दुसऱ्या नामांकित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 15 डिसेंबर 2014 रोजी डॉक्‍टरच्या सल्ल्याने घरी नेण्यात आले. 23 डिसेंबर 2014 रोजी त्याचा घरी मृत्यू झाला. एकुण उपचारासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च आला. त्याच्या आई-वडिल, दोन लहान मुलांनी ऍड. अनिरूध्द पायगुडे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे डेथ क्‍लेम दाखल केला. सुनावणी सुरू असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.

कारची विमा कंपनी असलेल्या युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. तो व्यावसायिक होता. दरमहा 15 हजार रुपये कमवित होता. उपचारासाठी आलेल्या खर्चाचा विचार करून 60 लाख रुपये नुकसान भरपाई मागण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर ही तडजोड झाली. त्याच्या मुलाला शिक्षणासाठी पैशाची गरज होती.

error: Content is protected !!