लॉकडाउन मध्ये डाउनलोडींग मध्ये या अँप ने ओलांडला १ कोटींचा आकडा

नवी दिल्ली | संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच याचा परिणाम प्रेम युगुलांवर झालेला दिसत आहे. कारण सध्या टाळेबंदीत प्रेम करणाऱ्या व्यक्तींमधील अंतर वाढलं आहे, पण एका अ‌ॅपने हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असं दिसून आलं आहे. हे अ‌ॅप टाळेबंदीत तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय झालं आहे.

टाळेबंदीमध्ये QuackQuack या देशी डेटिंग अ‌ॅपचे वापरकर्ते दिवसेंदिवस वाढतच आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, देशी डेटिंग अ‌ॅप QuackQuack ने तब्बल १ कोटी लोकांनी डाउनलोड केलं आहे. कंपनीच्या माहितीनुसार, टाळेबंदीत मागील दोन महिन्यांपासून १० लाख नवीन लोकांनी हे अ‌ॅप डाउनलोड केलं आहे.

टाळेबंदीत रोज १० लाख लोकांनी एकमेकांना या अ‌ॅपद्वारे लाईक केलं आहे. दररोज ३० लाख लोक प्रोफाईला भेट देत आहे. QuackQuack अ‌ॅपचे संस्थापक रवी मित्तल यांनी सांगितलं,”QuackQuack हे अ‌ॅप भारतात असलेले सिंगल्स यांच्यासाठी काढलेले आहे. नुकतेच याचे १ कोटी वापरकर्ते पूर्ण झाले आहे. QuackQuack अ‌ॅपच्या माहितीनुसार रोज ३.५० लाख ते ५ लाख लोक चॅट करतात. त्यातच कंपनीच्या म्हणण्यानुसार एका महिन्यात तब्बल १ कोटी ५० लाख लोक चॅट करतात.”

QuackQuack अ‌ॅपवर ५० टक्के मार्केटिंगची लोक, २५ टक्के व्यावसायिक लोक आणि २५ टक्के विद्यार्थी आहेत. रवी मित्तल म्हणाले, कंपनीच्या महसुलात २० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. QuackQuack हे भारतात सर्वात झपाट्याने वाढ होणारे डेटिंगसाठीचे व्यासपीठ आहे. याची सुरवात २०१० मध्ये झाली होती. पण आता टाळेबंदीत काही नवीन सुविधा त्यात समाविष्ट केल्याने झपाट्याने वापरकर्त्यांची ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!