गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं असेल तर आधी मुंबईत कोरोना टेस्ट करा

13 ते 21 ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र, सदर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड – 19 ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणे अनिवार्य करण्यात आली आहे. (Test the corona) सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यासच संबंधितांना प्रवास करता येईल.
यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर बसेस आज रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड – 19 ची चाचणी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही.तसेच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही. असे एस.टी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. 6 ऑगस्टपासून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरु केल्या आहेत. (Test the corona) आजपर्यंत तब्बल 10 हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!