जालना जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे शतक…! ; अँटिजेंन टेस्ट मध्ये आढळले ३७ पॉझिटिव्ह तर ६४ रुग्णांना डिस्चार्ज
जालना :जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार आज ( दि.१० ) सोमवारी अँटिजेंन टेस्ट द्वारे ३७ जणांचे नमुने पॉझिटिव्ह प्राप्त झाले तर ४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून ६४ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारा नंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.
मृत्यू झालेल्या ४ रुग्णांमध्ये रामनगर पोलीस कॉलनी येथील ५८ वर्षीय पुरुष,मिल्लत नगर येथील ३९ वर्षीय पुरुष, करवा नगर परिसरातील ६९ वर्षीय पुरुष, सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथील ६८ वर्षीय महिला अशा एकूण ४ रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेंन टेस्ट मध्ये आढळले ३७ पॉझिटिव्ह तर ६४ रुग्णांना डिस्चार्ज
➡️ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ( अँटिजेंन टेस्ट सह ) – 2915
➡️ यशस्वी उपचारा नंतर डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 1810
➡️ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या- 100
➡️ ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या- 1005
➡️ प्रलंबित नमुने – 107