दरम्यान जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या अँटिजेन टेस्ट, त्यासाठी आवश्यक किट, त्याचबरोबर उपलब्ध बेड, तसेच नव्याने आदेशित केल्याप्रमाणे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच आयसोलेट करणे व त्याबाबतची खबरदारी या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेत आवश्यक सूचना ना. मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
यावेळी काही शहरात लागू केलेला दहा दिवसांचा लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी तोडणारा ब्रेकडाऊन ठरावा असे नियोजन करावे, त्यासाठी अधिकाधिक चाचण्या करून निदान होणे आवश्यक असून त्यासाठी लागणाऱ्या किटची उपलब्धता व अन्य बाबींवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी त्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, अंबेजोगाई येथील लोखंडी सावरगाव हे आणखी एक हजार बेड क्षमता असलेले रुग्णालय सज्ज झाले असून, वीज जोडणीचे काम पूर्ण होताच तेही कोविड रुग्णांसाठी वापरता येईल अशी माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.