बीड (प्रतिनिधी):
बीड नगरपरिषदेच्या अत्यंत नाट्यमय आणि चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अभूतपूर्व यश मिळवले आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी भारतीय जनता पक्षाच्या डॉ. ज्योती घुमरे यांचा ३२,७८६ मतांच्या ऐतिहासिक फरकाने पराभव करत विजयश्री खेचून आणली आहे.
नगराध्यक्ष पदाचा निकाल (१२ व्या फेरीअखेर):
निकालाच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपच्या डॉ. ज्योती घुमरे यांनी आघाडी घेतली होती, मात्र १० व्या फेरीनंतर प्रेमलता पारवे यांनी जोरदार मुसंडी मारली. १२ व्या फेरीअखेर प्रेमलता पारवे यांना ३१,२६० मते मिळाली, तर डॉ. ज्योती घुमरे यांना २९,३६६ मतांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस-शपा (तुतारी) गटाच्या स्मिता वाघमारे यांना २३,९५४ मते मिळाली, तर वंचितच्या सुरेखा शृंगारे यांनी ४,९७५ मते घेतली. अखेर ३२,७८६ मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रेमलता पारवे विजयी घोषित झाल्या आहेत.
नगराध्यक्ष पद: १३ व्या फेरीअखेरचा अंतिम निकाल
सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपच्या डॉ. ज्योती घुमरे यांनी आघाडी घेतली होती, मात्र शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये प्रेमलता पारवे यांनी जोरदार मुसंडी मारत विजय खेचून आणला.
प्रेमलता पारवे (राष्ट्रवादी – घड्याळ): ३५,८१२ मते (विजयी)
डॉ. ज्योती घुमरे (भाजप – कमळ): ३२,०३३ मते
स्मिता वाघमारे (राष्ट्रवादी शपा – तुतारी): २५,५४० मते
सुरेखा शृंगारे (वंचित – पतंग): ५,२९१ मते
मताधिक्य: प्रेमलता पारवे यांनी ३,७७९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला आहे.
नगरसेवक पदाचे पक्षनिहाय बलाबल (२४ प्रभाग):
नगरसेवक पदाच्या निकालातही राष्ट्रवादी काँग्रेसने (घड्याळ) १८ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला १४ जागांवर समाधान मानावे लागले असून, राष्ट्रवादी (तुतारी) गटाने ११ जागा जिंकल्या आहेत. याव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीला ०२ जागा, शिवसेना शिंदे गटाला ०१ जागा, शिवसेना उबाठा गटाला ०१ जागा आणि काँग्रेसला ०१ जागा मिळाली आहे.
राजकीय घडामोडी आणि जल्लोष:
बीड नगरपालिकेत झालेला हा सत्तापालट भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुरुवातीला डॉ. ज्योती घुमरे यांची आघाडी पाहून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, मात्र शेवटच्या फेऱ्यांमध्ये घड्याळाने केलेले ‘कमबॅक’ निर्णायक ठरले. धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या रणनीतीचा हा मोठा विजय असल्याचे बोलले जात आहे.