आंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेला लागून एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक स्कार्पिओ गाडी आणि एका कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यात तीन व्यक्ती जागीच ठार झाल्या, तर इतर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, अपघातामध्ये मरण पावलेले आणि जखमी झालेले नागरिक कोणत्या गावचे आहेत, याबाबतची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.