बीड दि.10 (प्रतिनिधी) सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा बीड जिल्हा रूग्णालयाचे माजी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक कोकणे यांच्या धर्मपत्नी तथा फिजोओथेरपिस्ट डॉ.सुरज कोकणे यांच्या मातोश्री सौ.कांचन अशोक कोकणे यांचे औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजी रात्री दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 58 वर्षे होते.
दिवंगत सौ.कांचन कोकणे यांच्या पार्थीवावर बीड येथील मोंढा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात डॉ.अशोक कोकणे यांच्यासह दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. सौ.कांचन कोकणे यांच्या निधनामुळे विविध मान्यवरांनी डॉ.कोकणे परिवारांचे भेटून सात्वंन केले.