डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची एन्ट्री पोलिसांना स्पष्ट निर्देश

अनंत गर्जेला अटक झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांचे वक्तव्यपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी केलेल्या कथित आत्महत्येच्या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कठोर भूमिका घेतली आहे. गौरी गर्जे यांचे पती अनंत गर्जे यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. गौरीच्या कुटुंबियांनी या घटनेमागे हत्येची शंका व्यक्त केली असून, त्यांची मागणी लक्षात घेऊन वरळी पोलिसांनी या प्रकरणात बीएनएस (भारतीय न्याय संहिता) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य आरोपी अनंत गर्जे याला पोलिसांनी पहाटे अटक केली आहे, आणि आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.राज्य महिला आयोगाने या प्रकरणाच्या तपासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, गौरी गर्जे यांच्या आत्महत्येचा तपास पूर्णपणे निष्पक्षपाती आणि पारदर्शक असावा. शवविच्छेदनाचा (PM Report) जो अहवाल येईल, तो तपासामध्ये निर्णायक मानून त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जावी. आयोगाने असेही स्पष्ट केले आहे की, डॉ. गौरी यांच्या कुटुंबासोबत आयोग पूर्णपणे उभा असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत राज्य महिला आयोगाच्या वतीने सतत पाठपुरावा केला जाईल.

या घटनेच्या निमित्ताने चाकणकर यांनी राज्यातील पीडित महिलांना अत्यंत भावनिक आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, “सासरीत नांदत असताना होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करून आयुष्य संपवण्यापेक्षा, महिलांनी त्यांच्यावरील अन्याय आणि त्रासाची तक्रार करण्यासाठी पुढे यावे.” महिलांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी राज्य महिला आयोग, भरोसा सेल, वन स्टॉप सेंटर किंवा थेट पोलिसांकडे त्वरित मदत मागण्याचे आवाहन केले आहे. तसेच, माहेरच्या लोकांनाही त्यांनी सासरी असणाऱ्या मुलींना ‘माहेर हे तुमचे आहे’ हा आधाराचा आणि विश्वासाचा शब्द देण्यास सांगितले आहे.

error: Content is protected !!