अनंत गर्जेला तीन दिवसांची पोलीस कोठडी!


पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
गौरी गर्जे यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अनंत गर्जेला आज (सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गर्जेला २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोर्टात काय घडलं?
वरळी पोलिसांनी अनंत गर्जेची १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना खालील मुद्दे मांडले:
* आरोपीचे एका महिलेशी संबंध असल्यामुळे डॉ. गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली.
* लातूर येथील रुग्णालयात झालेल्या गर्भपाताचा पुरावा पोलिसांनी कोर्टात सादर केला.
* या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार आहेत.
* आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतो.
* गुन्हा आत्महत्येचा की हत्येचा, हे ठरवण्यासाठी पीएम रिपोर्ट (PM Report) येणे बाकी आहे.


गर्जेच्या वकिलांचा युक्तिवाद
अनंत गर्जेच्या बचाव पक्षाच्या वकिलांनी या मागणीला सहा मुद्द्यांवर काऊंटर आर्ग्युमेंट करत विरोध केला. त्यांचे मुख्य मुद्दे:
* आरोपी अनंत गर्जे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले असून तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत.
* आरोपीकडून काहीही जप्त करायचे नाही.
* एफआयआरमध्ये (FIR) असलेल्या बहिणीचे नाव अनावश्यक आहे, कारण ती कधीही मुंबईत आली नाही.
* गर्भपाताची घटना २०२१ पूर्वीची आहे, जी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने घडली होती.
* आरोपीने आपला मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे.
* बचाव पक्षाने कमीत कमी पोलीस कोठडीची मागणी केली.


महत्त्वाचे अपडेट्स
* आत्महत्येची घटना: वरळी येथे २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास डॉ. गौरी गर्जे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
* कुटुंबियांचा आरोप: गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.
* फॉरेन्सिक तपास: फॉरेन्सिक टीमने गर्जे यांच्या घरी जाऊन फास घेतलेल्या पंख्याची उंची आणि वजन मोजले आहे.

error: Content is protected !!